प.पू. बालयोगी श्रीसदानंद महाराज यांनी तुंगारेश्वर पर्वतातील औषधी वनस्पतीचा शोध घेऊन, विविध प्रकारची औषधी निर्माण केली आहेत. त्या सिध्द वनौषधीद्वारे आता पर्यंत हजारो रुग्णांना व्याधीमुक्त केले आहे.१९७१ पासून तुंगारेश्वर पर्वतावर बाबांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांनी आपल्या आश्रम परिसरात अनेक प्रभावी वनौषधी वनस्पतींची लागवड करून त्यांचे संवर्धन केले आहे. नित्यानंद फार्मसी या नावाने औषधी केंद्राची स्थापना करून बालयोगी श्रीसदानंद महाराज सिध्द वनस्पती केंद्र आणि सिध्द वनस्पती उपचार केंद्र सुरु केले आहे.
मणक्याचे आजार, मूत्रपिंडाचे आजार , मूत्रखडा, स्त्रियांचे आजार, मुळव्याध, क्षयरोग (टी.बी.), दमा, कावीळ, मधुमेह, अल्सर, पोटाचे विकार, संधिवात, उच्चरक्तदाब, कमी रक्तदाब, कुष्ठरोग, त्वचेचे विकार, केस गळणे, डोळ्यांचे आजार इत्यादी रोगावर उपचार केले जातात. या सर्व औषधांना महाराष्ट्र राज्य अन्न व औषध विभागाचा परवाना प्राप्त आहे.व्यसनमुक्ती, सर्पदंश, श्वानदंश इ. आजारावर मोफत उपचार केले जातात.
अमृत काढा, दांतीधी अर्क, रुधिर चूर्ण, नित्यानंद तेल, गोविंद तेल, रोपनी तेल, श्रीगोविंद मिश्रण, सदा-आनंद अशा अनेक नावाने युक्त असलेल्या औषधी तुंगारेश्वर आश्रम व सद्गुरूधाम श्रीगणेशपुरी येथे उपलब्ध आहेत.
सन २००० मध्ये बाबांनी सदा-आनंद (आयुर्वेदिक चहा) ची निर्मिती केली, हे १०० टक्के आयुर्वेदिक असून ताप, श्वासोश्वासाचा त्रास, हृदयविकार, मधुमेह, मूत्रपिंड, डोळे, अंगदुखी, श्वेतप्रदर इ. रोगावर रामबाण उपाय आहे.बाबांच्या भक्तपरिवारातच नाही तर अनेक प्रांतातून येणाऱ्या भाविकांची या सदा-आनंद चूर्णास मोठया प्रमाणात मागणी आहे. पंढरपूर पायी दिंडी सोहळा तसेच अनेक सामुदायिक कार्यामध्ये बाबांची औषधांचे तसेच सदा-आनंद पी या काढयाचे भाविकांना मोफत वाटप केले जाते.
प.पू. बाबांचे आयुर्वेद क्षेत्रातील विलक्षण कार्य लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य वनौषधी संशोधन समितीवर सन २००५ मध्ये बाबांची सल्लागार म्हणून निवड केली.