प. पू. बालयोगी श्रीसदानंद महाराजांचे जन्म गाव: मु.राई, ता. वसई, जि. ठाणे
प. पू. बाबांच्या आजोबांचे नाव: श्री. हरिश्चंद्र पाटील
प. पू. बाबांच्या आजीचे नाव: गंगाबाई
प. पू. बाबांच्या वडिलांचा जन्म:१० जून १९२२
प. पू. बाबांच्या वडिलांचे नाव: प.पू. वैजनाथ
प. पू. बाबांच्या मातोश्रींचे नाव: पार्वतीदेवी
प. पू. बाबांच्या माता पित्यांचा विवाह: १९४५
प. पू. बाबांचे वडील वैजनाथ बाबांची आवड: राष्ट्रकार्य
प. पू. बाबांच्या माता-पित्यांचे श्रद्धास्थान: जगद्गुरू नित्यानंद स्वामी
प. पू. बाबांच्या जन्मापूर्वी माता-पित्यांच्या जीवनातील महत्वाची घटना: नित्यानंद बाबांनी स्वप्नात गणेशपुरीस येण्याचा आदेश
प. पू. बाबांचा जन्म: श्रावण शु.पौर्णिमा शके १८८० शुक्रवार दि. २९ ऑगस्ट १९५८
प. पू. बाबांचे नाव सदानंद का? : नित्यानंद स्वामी हे आनंद पंथातील असल्याने त्यांच्याच परंपरेचा वारसा म्हणून प. पू. बाबांच्या जीवनात नित्यानंद स्वामींचा काही अनुभव: प. पू. सदानंद महाराज खेळताना गळ्यातील नित्यानंदाचा ताईत हातात धरून मोठ्याने किंचाळले मेलो मेलो व त्याच दिवशी ८ ऑगस्ट १९६१ रोजी सकाळी १०.४५ मिनिटांनी प.पू. नित्यानंद स्वामी ब्राहमतत्वात विलीन झाले.
प. पू. बाबांचा गृहत्याग: १२ व्या वर्षी अक्षय तृतीया २७ एप्रिल १९७१ नंतर पाच दिवस तुंगारेश्वर मंदिरात वास्तव्य.
प. पू. बाबांचे तुंगारेश्वर पर्वतावर प्रयाण: वैशाख सप्तमी १ मे १९७१
प. पू. बाबांनी तुंगारेश्वरच का निवडले? : तुंगारेश्वर हे पौराणीक स्थान असून ही भगवान परशुरामाची तपोभूमी आहे.
प. पू. बाबांचे तुंगारेश्वर येथे वास्तव्य:काही दिवस झाडाखालीच राहून नंतर गवत व कारवीच्या कुंडाची होती.
प. पू. बाबांच्या देव्हाऱ्यातील नित्य देवता: श्री.विठ्ठल रखुमाई, श्री साईबाबा श्रीनित्यानंद भगवान
प. पू. बाबांनी गणेशपुरी येथे पारायण केले: देव दीपावली १९७५
प. पू. बाबांचा आवडता मंत्र: राम
प. पू. बाबांच्या आश्रमातील नित्यक्रम: काकडआरती. श्रीज्ञानेश्वरी पारायण, आरती, हरिपाठ, भजन.
प. पू. बाबांच्या आश्रमातील वार्षिक कार्यक्रम: चेत्र शु.प्रतिपदा गुढीपाडवा, वैशाख शु.७ मी, विष्णूयाग, श्रीसत्यनारायणाची महापूजा, श्रावणी नारळी पौर्णिमा (बाबांचा जन्मदिवस), प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेस कीर्तन, भंडारा, कार्तिक अमावस्येला तुंगारेश्वर ते गणेशपुरी पर्यंत पायी दिंडी सोहळा.
प. पू. बाबांच्या आश्रमातील मंदिराचा भूमिपूजन सोहळा: ११ मार्च १९९८ कोनशिला २५ मार्च १९९८
प. पू. बाबांच्या पिताश्रींचे वैकुंठगमन: अधिक जेष्ठ कृ. ९ मी. मंगळवार दि. ८ जून १९९९ रोझी सायं.६.००
प. पू. बाबांचा आवडीचा विषय: पंढरीचि वारी, भजन
प. पू. बाबांचे प्रिय ग्रंथ: श्रीज्ञानेश्वरी, श्री. भागवत, श्रीतुकोबारायगाथा
प. पू. बाबांचा शुभ संकल्प: मराठी भाषेतील तत्त्वज्ञान अखिल विश्वात पोहचवणे.
प. पू. बाबांनी हिंदी ज्ञानेश्वरीचे प्रकाशन केले: कार्तिकी व एकादशी १२ नोव्हेंबर २००९ द्वितीय आवृत्ती प्रकाशन कार्तिक कृ. एकादशी २ डिसेंबर २०१० आळंदी येथे विश्वशांती केंद्रा व्यासपीठावर
प. पू. बाबांनी कशी येथे हिंदी पारायण केले: डिसेंबर २००९ मध्ये संपन्न.
प. पू. बाबांचा गौरव: ७५० वर्षापूर्वी श्री ज्ञानोबारायांच्या माथ्यात घातलेला मुकुट पुन्हा काशीच्या पंडितांनी२००९ मध्ये बाबांना प्रदान केला.
प. पू. बाबांचे हरिद्वार येथे पारायण : सन २०१०
प. पू. बाबांचे श्रीद्वारका येथील हिंदी पारायण: जानेवारी २०११ उपस्थिती २५००० वाचक
प. पू. बाबांच्या आश्रमातर्फे होणारे आणखी उपक्रम: बालसंस्कार शिबीर, रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य तपासणी शिबीर, आयुर्वेदिक औषधोपचार